‘ब्रिगेड’ उतरणार ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात

0

वरणगाव । सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या या समस्या लक्षात घेवून त्या सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेड निवडणूकीच्या मैदानात उतरली असून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वबळावर निवडणूका लढणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी केले. शहरात संभाजी ब्रिगेडची जिल्हा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी या बैठकीत मार्गदर्शन करतांना सर्व ग्रामपंचायत स्वबळावर लढवणार, असे सुतोवाच केले. प्रसंगी बी.आर. पाटील, संजय काकडे, अमोल पाटील, अनंता वाघ, प्रा. अनंतराव देशमुख उपस्थित होते.

गावातील समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार
सर्व तालुकाध्यक्षांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत स्वबळावर लढवावी. सध्या ग्रामपंचायत परिसरातील वातावरण प्रस्थापित पक्षांनी अत्यंत विषारी केले आहे. कुठल्याच गावाचा विकास नाही तेच तेच मुद्दे पाणी, गटार, रस्ते, बेकारी या मुद्यांभोवती गावाच्या निवडणुका लढवल्या जात आहे. गावाचा भकासपणा वाढला आहे. गावात रोजगार नाही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे डॉ. अनिल यांनी मार्गदर्शन करतांना बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन सांगितले. यावेळी प्रदीप गायके, विलास ताठे, निवृत्ती ढोले, सचिन पाटील, देव जैस्वाल, योगेश महाजन, योगेश चोपडे, दीपक ठाकळे, राहुल महाजन, हरी मुलाडे, महेंद्र दुट्टे, जितेंद्र मुळे, किरण ढगे, गजानन शिंदे, त्रिशुल मराठी, ज्ञानेश्‍वर पाटील, पंकज पाटील, अनिल पाटील यांच्यासह भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या परिसरातील सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.