जकार्ता-इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. ब्रिज क्रीडा प्रकारात भारताची पुरुष जोडी प्रणब बर्धन आणि शिबनाथ डे यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेतले भारताचे हे १५ वे सुवर्णपदक ठरले आहे.