नवी दिल्ली । भारताचे क्रिकेट असलेले नाते खुप जुने आहे. त्यामुळे बीसीसीआय व क्रिकेट असे अतुट नाते आहे. मात्र बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया यासाठी जे चिन्हे वापरण्यात येत आहे. ते ब्रिटीशकालीन आहे. ब्रिटीश शासनाकडून दिल्या जात असलेल्या स्टार ऑप इंडियाप्रमाणे दिसतो आहे. त्यामुळे या भारतीय क्रिकेट बोर्डाच्या ( बीसीसीआयच्या )चिन्हात भारताचा ध्वज, अशोक स्तंभ, किवा अशोक चक्र नसून तो स्टार आहे. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे लोटल्यानंतर व भारतीय क्रिकेट टीमची जगाला वेगळी ओळख निर्माण झाल्यानंतरही ब्रिटीशांची ही निशाणी का मिरविली जात आहे असा त्यांचा सवाल आहे.याबाबत केंद्रीय सूचना आयोगाने पंतप्रधान कार्यालय तसेच केंद्रीय क्रिडा मंत्रालयाकडे बीसीसीआय वापरत असलेल्या लोगोसंदर्भात विचारणा केली आहे.
स्टार ऑफ इंडिया
सूचना आयोगाच्या म्हणण्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इडियाच्या हा लोगो ब्रिटीशकालीन आहे.या लोगोत जे चिन्हे वापरले जात त्यात ब्रिटनतर्फ दिल्या जात असलेल्या स्टार ऑफ इंडियाप्रमाणे दिसतो आहे. आयेागाच्या म्हणण्यानुसार भारतात स्वातंत्र्याचा पहिला संग्राम मानल्या गेलेल्या 1857 च्या उठावानंतर ब्रिटीशांनी त्यांच्या सत्तेला मदत करणार्या लॉयल भारतीय राजांना नाईडहूड असा सन्मान देण्याची प्रथा सुरू केली होती. त्याला स्टार ऑफ ऑनर म्हटले जात असे. भारतावरचे आपले साम्राज्य अधिक मजबूत करण्यासाठी खेळला गेलेला हा डाव होता. 1948 नंतर असा सन्मान दिला गेलेला नाही. बीसीसीआयने मात्र आजही ब्रिटीश विरासतीशी काडीमोड घेतलेला नाही हेच या लोगोवरून दिसून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
भारताचे अशोकस्तंभ
भारताला स्वतंत्र्य मिळून बराच वर्षाचा कालवधी लोटला आहे.तरी ही ब्रिटीशांनी या देशावर राज्य केले होते. त्यांनी त्या काळात त्याचे राज्य अबाधीत राहवे यासाठी दिलेल्या उपाध्या, निशाण्या अजुनही वापरत आहे. ब्रिटीशकाकडून भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले त्यांनतर भारताने अशोक स्तंभ , अशोक चक्र हे चिन्हे भारताचे प्रतिक म्हणून स्विकारले आहे. भारतातून खेळाल्या जाणार्या प्रत्येक खेळाडूला अशोक चक्र किवा तिरंगा असलेले ड्रेस कोड असतो.मात्र बीसीसीआय आपल्या लोगोमध्ये स्टार वापरतो.त्या ऐवजी अशोकस्तंभ, तिरंगा, धम्मचक्र या व अशा सच्च्या भारतीय प्रतीक चिन्हांचा वापर करणे अधिक योग्य असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.