ब्रिलियंट स्टार स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

0

पिंपळे गुरव (प्रतिनिधी) – देवकर पथ येथील एम. जी. देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूलमध्ये स्वतंत्र भारताचा 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रीय विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक वसंत जाधव यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर बालचमुंनी प्रजासत्ताक दिनाविषयी मनोगत व्यक्त केले. देशभक्तीपर गीते व योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी योगासने सादर केली व उपस्थितांची मने जिंकली.

विद्यार्थ्यांना संस्कार गरजेचे!
आपले मनोगत व्यक्त करताना जाधव यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. मुलांवर शिक्षणाबरोबरच योगासने व चांगले संस्कार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शेवटी प्रमुख पाहुणे व सर्व कार्यक्षम शिक्षकांचा सत्कार करण्यात आला व सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रशालेत साजर्‍या झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्यास संस्थापक रामदास देवकर, बीव्हीजी कंपनीच्या संचालिकातथा आदित्य हॉस्पिटलच्या संस्थापिका डॉ. स्वप्नाली गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देवकर, नवनाथ देवकर, अनिल देवकर व पालक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता जगताप यांनी केले तर मुख्याध्यापिका वंदना देवकर यांनी सर्वाचे आभार मानले.