मुंबई : तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नवाब मलिक यांना अटक केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळउ डाली आहे. या प्रकारानंतर राज्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी संतप्त झाले आले असून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे.रुग्णालयात नेण्यात येत आहे.
हा तर सरळ यंत्रणेचा गैरवापर : शरद पवार
नवाब मलिकांवरील कारवाई हे केंद्रीय यंत्रणेच्या गैरवापराचं उदाहरण असल्याचे शरद पवार यांनी म्हणत संताप व्यक्त केला आहे. पवार म्हणाले याबाबत काय बोलायचं? यात काही नवीन नाही. सध्या ज्या प्रकारे यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे त्याचं हे एक उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे कधीतरी घडेल. नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.