नवी दिल्ली । स्टार स्पोर्ट्सच्या ट्विटर अकाऊंटवरून नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा सुरु आहे. अर्थात हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हालादेखील याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ब्रेट ली चक्क कुस्तीच्या आखाडात उतरला आहे. अस्सल पैलवानाप्रमाणे ब्रेट लीने आखाड्यात प्रवेश करण्याआधी मातीला वाकून नमस्कार केला. दंड बैठका मारल्या. त्यानंतर एका पैलवानासोबत खेळताना अवघ्या 30 सेंकदामध्ये त्याला चीतपटही केले. सध्या ब्रेट ली कर्नाटक प्रिमियर लीगमध्ये 2017 मध्ये कॉमेंट्री पॅनलचा एक भाग आहे.
पण केवळ पॅनलचा भाग म्हणून नाही तर त्याने कन्नड भाषेत बोलण्याचाही प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी कन्नड भाषेतील एक खास व्हिडिओ ट्विटरवर शेअरही करण्यात आला होता. क्रिकेट व्यतिरिक्त भारतात ब्रेट ली अनेक सामाजिक संस्थांचा एक भाग म्हणून काम करत आहे.