ब्रेड- पाव महागणार

0

मुंबई – सकाळच्या नाश्त्यासाठी असलेला अनेकांचा आवडता पदार्थ ब्रेड आणि पाव आता महाग होणार आहे. क्वालिटी कंपनीच्या ब्राऊन ब्रेडचा भाव दोन दिवसांपूर्वीच ३३ रुपयांवरून ३५ रुपये झाला आहे.

ब्रिटानिया कंपनीच्या ब्रेडचे ही भाव वाढल्यामुळे २ रुपयांचा भार सामान्यांच्या खिशाला पडत आहे. शनिवारपासून कंपनीचे ब्रेड किंवा लादी पाव देखील महाग होण्याच्या मार्गावर आहेत. या भाववाढीसाठी मैद्याचे वाढत असलेले भाव आणि प्लास्टिक बंदी ही मुख्य कारणे आहेत.