पालघर । डहाणू तालुक्यातील कासा येथील आदिवासी समाजातील शेतकरी कुटुंबातील गोविंदा दहीहंडीचा उत्सव संपल्यावर दोरी काढतांना कोसळून गंभीर जखमी झाला. ब्रेनडेड कैलास जयराम घाटाळच्या परिवाराने अखेर विलासचे हृदय, किडणी, लीव्हर चे दान करून चार जणांना जीवदान देऊन नवीन आदर्श घडविला आहे. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यावर बांधलेला दोर सोडण्याकरिता कैलास झाडावर चढला आणि दुर्दैवाने तो खाली कोसळला याच वेळी त्याच्या डोक्याला जबर मार लागून तो जबर जखमी होऊन बेशुद्ध झाला होता.
त्याला तात्काळ जवळील कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सिलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात दाखल केले तेथून त्याला पुढील उच्च उपचाराकरिता वलसाड सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले तिथे त्याचे सिटी स्कॅन केल्यावर ब्रेन ह्यामरेज झाल्याचे तेथील वैदकीय चिकित्सकांनी 16 ओगस्टला 3.30 वाजता सुरत मधील नवी हॉस्पिटल मध्ये डॉ निमेश वर्मा याच्या देखरेखीखाली उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर 19 ऑगस्ट ला न्यूरोसर्जन डॉ. मेहुल मोदी आणि न्युरोफिजीसियन डॉ. परेश झान्जमेरा यांनी कैलासला ब्रेनडेड घोषित केले.
अवयवांचे असे झाले वितरण
संमती मिळाल्यावर डोनेट लाईफच्या निलेश मंडेलवाला यांनी इंन्स्टिट्युट ऑफ किडनी डीसीसेस आणि रिसर्च सेंटर अहमदाबाद च्या डॉ प्रांजल मोदी यांच्याशी किडनी आणि लीव्हरसाठी संपर्क केला आणि हृदयासाठी सिम्स हॉस्पिटल आणि स्टर्लिंग हॉस्पिटलला संपर्क केला, मात्र उपयोग न झाल्यानंतर रिजन ऑर्गन आणि टीशुज ट्रान्स्पलंट ऑर्गनायझेषणच्या डॉ. सुजाता पटवर्धन यांना संपर्क केला त्यावेळी रोटोची वेटिंग मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये आहे त्यानुसार ह्याकामी कार्यरत असलेल्या टीमने सुरतमध्ये येऊून हे हृदय स्वीकारले. किडनी आणि लीव्हरचे दान आई के डी आरसीचे डॉ. बिपीन पाल यांच्या टीमने स्वीकारुन सुरतच्या नेव सिव्हील रुग्णालयातून मुंबईपर्यंत 269 किलोमीटरचे अंतर 86 मिनिटांत पार करून हृदयाचे रोपण महाराष्ट्रातील मालेगावमधील रविना शरद अंतुरेकर 20 हिला केले. एक किडनी गांधीधाममधील जिमी अशोक दादलानी 46 आणि दुसरी किडनी राजस्थान मधील भौतिक दुष्यंत सोहनी 27 यांना रोपण करण्यात आली तर लिवर भावनगर मधील ईश्वर केशव मेंदापडा 38 यांना देण्यात आले.
डोनेट लाईफच्या टीमने कैलासच्या कुटुंबियांचे अवयवदानावर केले प्रबोधन
निवी सिव्हील रुग्णालयाच्या सर्जरी विभागाने हि बाब डोनेट लाईफ या संस्थेच्या निलेश मांडलेवाला यांना कळविले. यानंतर डोनेट लाईफची संपूर्ण टीम रुग्णालयात दाखल झाली. या टीमने कैलासच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना ब्रेनडेडच्या बाबतीतली महत्वाची माहिती समजावून सांगितली आणि अवयव दानाचे महत्व पटवून दिले. ह्याच बाबींचे महत्व जाणून कैलासच्या कुटुंबीयांनी एक आदर्शवत निर्णय घेत अवयवदानाकरिता संमती दर्शवित मानवाचे शरीर नष्ट करण्यापेक्षा इतरांना जीवनदान देत असेल तर खूप मोठे भाग्य आणि आमचा कैलास हि आम्हाला पुन्हा ह्या रूपाने दिसेल अशी भावना प्रकट करत जगासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे.