‘ब्रेन डेड’ रुग्णांचे अवयदान

0

पुणे :- ससून रुग्णालयात ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाने आपले जीवन संपण्यापूर्वी सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याच्या निर्णयामुळे चार जणांना जीवनदान मिळणार आहे. ब्रेन डेड रुग्णाने अवयव दानाचा निर्णय घेतला आहे. तीन मे रोजी दुचाकीच्या अपघातात 15 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे प्राण वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान 5 मे रोजी तो ब्रेन डेड झाला होता. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले, अर्जुन राठोड, एम.बी.शेळके आणि राजश्री कोरके यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना अवयव दानाचे महत्व पटवून दिले.

ससून सर्वोपचार रुग्णालयातील गरजू महिलेला आणि पुण्यातील खाजगी रुग्णालयातील एका गरजू रुग्णाला किडन्या दान करण्यात आल्या आहेत. नाशिकमधील रुग्णालयातील रुग्णाला यकृत तर चेन्नईमधील रुग्णालयातील रुग्णाला हृदय दान करण्यात आले. ससूनमध्ये एका आठवड्यातील दुस-यांदा किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक अवयवदानासाठी तयार झाले. ब्रेन डेड झालेला रुग्ण तरुण असल्यामुळे त्याचे सर्व अवयव चांगले होते. त्याच्या दोन किडन्या, यकृत आणि ह्रदय शस्त्रक्रिया करून काढण्यात आल्या.