मुंबई: जगभरात कोरोना हाहाकार माजवला आहे. संख्या दररोज वाढत आहे. भारतातील संख्या चारशेच्या जवळपास पोहोचली आहे. त्यात महाराष्ट्रातील संख्या ८९ वर पोहोचली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या भीतीपोटी रक्तदान करण्याची संख्या देखील घटली आहे. त्यामुळे आता ब्लड बँकेत मर्यादित रक्तसाठा शिल्लक राहिला असल्याने केवळ १० ते १५ दिवसच पुरेल इतका रक्तसाठा शिल्लक राहिले असल्याचे माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
त्यामुळे आता रक्तदान करण्याची आवश्यकता असून नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. रक्तदान केल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतो ही केवळ अफवा असून जनतेने त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.