ब्लूमबर्ग क्विंटवर अर्थसंकल्पाचे तज्ज्ञांद्वारे विश्‍लेषण

0

ठाणे । जीएसटी निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प नेमका कसा आहे त्याचा सामान्य व्यक्तीच्या आयुष्यावर तसेच जागतिक गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार आहे याचे विश्‍लेषण करण्याकरता ब्लूमबर्ग क्विंट या भारतातल्या आघाडीच्या व्यवसाय आणि वित्त वृत्त कंपनीने 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस विशेष चर्चासत्रांचे आयोजन केले असून यात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. बँकिंग क्षेत्रातील मोठ्या एनपीए समस्या, जीडीपीची कमी वाढ, वाढती बेरोजगारी, खाजगी गुंतवणुकीत निर्माण झालेला तुटवडा या दृष्टीने अर्थसंकल्पात काय पावले उचलण्यात आली आहेत, अशा अर्थसंकल्पाशी संबंधित विविध पैलूंवर आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ प्रकाश टाकणार आहेत. ब्लूमबर्ग क्विंट डॉटकॉमसह फेसबुक, ट्विटर, याहू, यूट्यूब आणि हॉटस्टार, व्होडाफोन प्ले, यप्पटीव्ही, झेंगा टीव्ही, नेक्सजीटीव्ही आणि इतर प्रमुख सामाजिक मंचावर हे प्रक्षेपण उपलब्ध असेल. सोबतच डेलीहंट, बाजार मोजो, याहू, सिफी फायनांस, जिओ चॅट, जिओक्सप्रेस न्यूज, जस्ट डायल सोशल अ‍ॅण्ड द क्विंट या मंचावरदेखील तज्ज्ञांचे विश्‍लेषण उपलब्ध असेल.

अर्थव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न
ब्लूमबर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल उनियाल म्हणाले, आमचा संपादकीय फोकस आत्मविश्‍वासावर आहे, तो बजेटसाठी एक धाडसी अजेंडा बनवतो आणि आमच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देण्यासाठी आणि आव्हानांच्या हृदयापर्यंत जातो. पुढे, आम्हाला आमच्या बजेट ऑफरिंगवर उपभोक्ता आणि जाहिरातदार यांचा जास्त प्रतिसाद पाहून आनंद झालेला आहे. 2 दशलक्षपेक्षा जास्त मासिक वापरकर्त्यांसह, सर्व प्रमुख सामाजिक, ओ.टी.टी. आणि एग्रगेटर प्लॅटफॉर्म्समध्ये एक सतत विस्तारत असलेली मल्टि-प्लॅटफॉर्म उपस्थिती, वापरकर्ता उत्पादनांचा वेगाने वाढणारा संच आणि एआर ग्राफिक्स, व्हाट्सएप बातम्या सेवा आणि 30 पेक्षा अधिक मार्केट ब्रॅण्डसह व्यावसायिक भागीदारी असलेले नवीन उपक्रमयांसह एक ब्रँड म्हणून, आम्ही खूपच कमी काळात खूप लांबवर आलो आहोत.