मॉस्को । गेमच्या नावे मुलांना जीव द्यायला भाग पाडणार्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाइंडला अखेर अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, अटक करण्यात आलेली आरोपी ही 17 वर्षांची मुलगी आहे. रशियन पोलिसांनी तिला बुधवारी बेड्या ठोकल्या. ब्लू व्हेल गेम चॅलेंजमागे तिचाच हात असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
ही मुलगी ब्लू व्हेल गेम खेळणार्यांना टास्क द्यायची. त्यानंतर टास्कच्या नावे आत्महत्येस प्रवृत्त करायची जर टास्क पूर्ण केला नाही, तर गेम खेळणार्याला त्याच्या परिवाराची हत्या करण्याची धमकी देत असे, असा आरोप तिच्यावर आहे. पोलिसांनी आरोपी आरोपी मुलगी मनोविज्ञानाची विद्यार्थिनी आहे. तिने आपला गुन्हा कबूल केल्याचाही दावा पोलिसांनी केला. मुलीला न्यायालयात हजर केला असता, तिला तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.