मुंबई । लहान मुलांच्या जीवघेण्या ‘द ब्लू व्हेल’ गेममुळे मोठ्या प्रमाणात मुले आत्महत्त्या करत आहेत. अशा या गेममुळे सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. मात्र तरीही फेसबूक आणि गुगल या सामाजिक संकेतस्थळांकडून यावर गंभीर दखल घेतली जात नाही, याप्रकरणी या दोन्ही कंपन्यांनी एका आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. प्रतिवादींना पाठवलेली नोटीस काल म्हणजे बुधवारी फेसबुक आणि गूगलच्या भारतातील पत्त्यांवर मिळाली असल्याने उत्तर देण्यास दोन्ही कंपन्यांनी वेळ मागून घेतली आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने फेसबुक आणि गूगल दोघांनाही फटकारले.
काय आहे ब्लू व्हेल गेम?
रशियातून उदयास आलेल्या या गेममध्ये खेळणारा आणि त्याचा अदृश्य मार्गदर्शक यांच्यात अजाणतेपणी एक दृढ नाते निर्माण होते. ठरावीक टप्यानंतर खेळणार्याला त्याचा मार्गदर्शक एक-एक काम सांगत जातो. पुढच्या टप्यावर पोहोचण्यासाठी ते काम पूर्ण करून त्याचा पुरावा देणे खेळणार्याला बंधनकारक असते. या खेळात शेवटच्या टप्प्यावर खेळणार्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जाते.
इथे मुलांचे जीव जात आहेत आणि आपण याबाबत अजिबात गंभीर दिसत नाहीत. त्यामुळे आपण लवकरात लवकर आपले उत्तर सादर करा, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. जीवघेणा ऑनलाइन गेम ‘द ब्लू व्हेल’ विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सिटीझन सर्कल फॉर सोशल वेलफेअर अॅण्ड एज्युकेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी या याचिकेत गुगल, फेसबुक, याहू यांच्यासह मुंबई पोलिसांच्या सायबर सेललाही प्रतिवादी बनवले आहे. जीवघेणा ऑनलाइन गेम ’द ब्लू व्हेल’विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सिटीझन सर्कल फॉर सोशल वेलफेअर अॅन्ड एज्युकेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
सरकारही न्यायालयात अनुपस्थित
प्रशासनाने द ब्लू व्हेल गेमशी संबंधित तक्रारी आणि समस्यांसाठी एक हेल्पलाइन सुरू करावी. जेणेकरुन या गेमच्या आहारी जाणारी लहान मुले तसेच त्यांच्या पालकांना यासंदर्भात तातडीने मदत करता येईल, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. या प्रकरणात मुंबई सायबर सेल आणि राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करायच होते. मात्र, सायबर सेल आणि राज्य सरकारकडून कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे याबाबत सरकारही फारसे गंभीर नसल्याचे समोर आले आहे.