35 वर्षीय सेरेनाने बेबीबम्पसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. यात ती सात महिन्यांची गरोदर आहे… सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमुळे नेटिझन्समध्ये चर्चेला एक विषय मिळाला आहे… या फोटोवर अनेक सकारात्मक-नकारात्मक प्रतिक्रिया येत असल्या, तरी सेरेना मात्र यात बिनधास्त दिसते…
जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दोन महिन्यांनी गरोदर असूनही सेरेना खेळली, ती मॅच खेळताना तिला स्वतःलाच ही गुडन्यूज नुकतीच कळली होती. खरंतर टेनिस हा अंगमेहनतीने खेळला जाणारा खेळ आहे. प्रचंड धावपळ, मेहनत, कसरत करावी लागत असूनही सेरेनाने आत्मविश्वासाच्या नि इच्छाशक्तीच्या बळावर ती स्पर्धा जिंकली होती. याआधी तिच्या गरोदर असण्याबाबत कोणालाही काहीही माहीत नव्हते. तिने मीडियालादेखील ही बातमी दिली नव्हती. पण यावेळी मात्र ती गरोदर असल्याची गोड बातमी तिने स्वत:च सगळ्यांना दिली…
कव्हरगर्ल म्हटलं की एखादी गोरीपान सुंदर मुलगी आपल्या डोळ्यांसमोर येते. मग तिचे कपडे, मेकअप आणि इतर गोष्टींवर जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. पण, वर्णभेदाच्या नाकावर टिच्चून सेरेनाने लश्ररलज्ञ ळी लशर्रीींळर्षीश्र कसं असतं, हे जगाला दाखवून दिले. सावळ्या वर्णातली सेरेना चेहर्यावरच्या आत्मविश्वासामुळे आपल्यात ऊर्जा भरण्याचं काम करते. सेरेनाची फोटोग्राफर अपपळश ङशळर्लेींळीूं ही एक जगप्रसिद्ध फोटोग्राफर आहे. प्रत्येक कलाकृतीत जीव ओतण्याचा ती नेहमीच प्रयत्न करते. तिने अत्यंत कौशल्याने हा अप्रतिम फोटो काढला आहे. यात सेरेनाने एका हाताने आपले स्तन झाकलेत नि दुसरा हात कमरेवर ठेवला आहे. समोरच्या बाजूला ताठ मान यात तिचा जबरदस्त भाव दिसून येतो आहे.
भारतात दीपिकाने केलेल्या मू लहेळलशफ या व्हिडिओनंतर अनेकांनी तिच्यावर कट्टर फेमिनिस्ट म्हणून भयंकर टीका केल्या होत्या. सोशल मीडियावर मात्र भारतीय तरुणींनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला होता. कित्येक तरुणींच्या मनातलं हेरण्याची दीपिका एक उत्तम माध्यम ठरली होती. पण तरीही तिच्या बोल्डपणामुळे अनेकांनी तिला बोल लावले होते. त्यानंतर प्रियांका चोप्राच्या फोटोशूटमुळे तीही वादात अडकली. इतकंच नव्हे तर पंतप्रधानांसमोर मिनी फ्रॉकमध्ये बसल्याने तिच्यावर संस्कृती रक्षकांनी टीकास्त्र सोडले होते. पण या दोघींनी पुढचं पाऊल उचलून भारतीय तरुणांमध्ये बोल्डपणाची नवी व्याख्या रुजवली.
कित्येक तरुणींनी या दोघींकडे आपले रोलमॉडेल म्हणून पाहायला सुरुवात केली, पणमनात असा एक विचार येतो की, जर सेरेना भारतीय असती आणि तिने इथे राहून असे काही केले असते तर? तर काय झालं असतं? भारतातल्या स्वयंघोषित संस्कृती रक्षकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला असता. भारतीय संस्कृती आपल्याला हे शिकवत नाही, असं सांगून तिच्या करिअरची माती केली असती. पण खजुराहो, अजिंठा-वेरूळ येथील कित्येक लेण्यांवर स्त्रियांच्या मादकतेचा, त्यांच्या शरीर सौंदर्याचे शिल्प कितीतरी सुंदररीत्या कोरले गेले आहेत. इतकंच नव्हे तर संभोगाचेही चित्र साकारून स्त्री-पुरुषाचे मिलन सरळसरळ दाखवले आहे आणि कित्येक वर्षांपासून हे शिल्प आपण भारतीय संस्कृती म्हणूनच जपून ठेवत आहोत, तर मग आजच्या स्त्रीबद्दल, तिच्या हिमतीबद्दल यांना एवढी अनासक्ती का? यांना तेव्हा आपली संस्कृती दिसत नाही का? मग तिच्या नावाचे इथे धिंडवडे काढले गेले असते, पुतळे जाळणे, खेळावरच बहिष्कार टाकणे वगैरे वगैरे… त्यातही राजकारण झाले असते. कोणी सपोर्ट करत असेल तर त्याला कमी लेखण्यासाठी दुसर्याने लगेच अपोज केला असता. मीठ मसाला लावून भारतीय मीडियाने राईचा पर्वत केला असता. अडाणी लोकांनी तर छी-थू केलीच असती, पण सुशिक्षित अडाण्यांनाही यामागचं कारण जाणून घेण्याची गरज भासली नसती.
मेंढराप्रमाणे एक वाईट बोलला की ती वाईट, नि चांगला बोलली की चांगली, ही मनोवृत्ती कधी बदलणार? हे तेच बुरसटलेल्या मनोवृत्तीचे लोक आहेत, जे घरातल्या मुलीला घरात पायघोळ झग्यात ठेवतात नि बाहेर बेशरम होऊन फिरतात. पण मुळातच लोकांना ही गोष्ट कशी कळत नाही की, तिचं आई होणं ही आनंदाची बातमी आहे, यात विरजण कसं घालावं? भारतीय बायका गरोदरपणात हे करू नये, ते करू नये, वाकू नको, झुकू नकोस, अशा प्रकारच्या आज्ञा पाळून हालचाल न करता एका ठिकाणी बसून राहतात. माणूस चंद्रावर पोहोचला तरी अद्यापही त्याच्या ग्रहणाचे ग्रहण, त्याचे नियम अजूनही आपली पाठ सोडत नाहीय… गरोदरपणात दुखणं खुपणं आणि मग हेच खा, तेच नको, उत्तम डाएट हे सारं काही पाळतात. पुण्या-मुंबईसारख्या शहरी भागात कुठे मिळतो आराम नि काय? तरीही इतर बहाणे असतातच, पण सेरेनाने स्पर्धेत उतरून मेहनतीने जिंकून स्वतःच्या मनोबलाचे नि स्त्रीशक्तीचे उत्कृष्ट उदाहरण समस्त महिला वर्गापुढे ठेवले आहे. सेरेना, सलाम आहे तुझ्या या हिमतीला!
समीना दलवाई,
असोसिएट प्रोफेसर, जिंदाल ग्लोबल युनिर्व्हसिटी