ब्लॅक बेल्ट पदवीदान समारंभ उत्साहात

0

तळेगाव दाभाडे । महाराष्ट्र तायचि चुआन कुंग-फू असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचा ब्लॅक बेल्ट पदवीदान समारंभ तळेगाव येथील जनरल हॉस्पिटलच्या रिक्रिएशन सभागृहात नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक संदीप शेळके, नगरसेवक संतोष शिंदे, प्रा. वसंत पवार, निशिकांत प्रधान, रजनीकांत सराफ यांच्या हस्ते झाले. यावेळी संग्राम काकडे, वेदिका फाउंडेशनचे विकास झेंडे, सांतोष राक्षे, निशिकांत प्रधान, रजनीकांत सराफ आदी मान्यवर
उपस्थित होते.

ओमकार पारखी, अभिषेक बगलाने, यश भोंगले, रिषब म्हंकाळे, अलोक प्रधान, नितेश चव्हाण, अनिशा खंडागळे, योगिता लामा, हर्षदा शिंदे, आरती टपाले, रिया राजपूत, कीर्तिराज चोणगे यांना ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये प्रथम श्रेणीत विक्रांत अग्रवाल, प्रेम सराफ, गौरी देसाई तर नैना लामा, राजतिलक बादी यांनी द्वितीय श्रेणीत ही परीक्षा उत्तीर्ण केली. ब्लॅक बेल्ट मिळालेल्या विद्यार्थ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.

कुंजीर, खंडाळे यांना जीवनगौरव
कार्यक्रमात प्रशिक्षक संदीप कुंजीर, सुनील खंडाळे यांना इन्स्ट्रक्टर जीवनगौरव तर नवीन वाघेला यांना ग्रेट तायचि मास्टर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीफू सी. एल. लामा, संदीप कुंजीर, सुनील खंडाळे यांनी केले.