ब्लॉकला कंटाळले प्रवासी : सिग्नल यंत्रणा बदलासाठी पुन्हा 12 रेल्वे गाड्या रद्द

Railway block in Wardha : Maharashtra : 12 trains canceled including Shalimar भुसावळ :  वर्धा-चितोडा दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून वर्धा जंक्शन स्थानकावर यार्ड बदल आणि सिग्नल यंत्रणा बदलाचे काम करण्यात येणार असल्याने या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागातून जाणार्‍या 12 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तरसात गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले. वारंवार रेल्वेकडून ब्लॉक घेतले जात असल्याने सण-उत्सवांच्या दिवसात प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. दोन महिने अगोदर प्रवाशांनी कन्फर्म तिकीटे काढून ठेवली असली तरी वेळेवर ती तिकीटे रद्द होत आहे.

या गाड्या झाल्या रद्द
अमरावती-वर्धा मेमू गाडी 11 ते 17 ऑगस्ट या काळात रद्द असेल तर याच काळात परतीच्या मार्गावरील वर्धा-अमरावती गाडीही रद्द करण्यात आली. कोल्हापूर-गोंदिया एक्सप्रेस ही गाडी 15 ते 17 दरम्यान रद्द असेल तर परतीच्या प्रवासात हीच गाडी 16 ते 18 दरम्यान रद्द करण्यात आली. कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस ही गाडी 15 ऑगस्टला तर नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस ही गाडी 16 ऑगस्टला रद्द करण्यात आली. शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस ही गाडी 15 व 16 तर एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस ही गाडी याच काळात रद्द करण्यात आली. एलटीटी-बल्लारशाह ही गाडी 16 तर बल्लारशाह-एलटीटी एक्स्प्रेसही गाडी 17 ऑगस्टला रद्द करण्यात आली. अजनी-अमरावती एक्स्प्रेस ही गाडी 15 ते 17 तर अमरावती – अजनी एक्स्प्रेस ही गाडी 16 ते 18 या काळात रद्द करण्यात आली आहे.

या गाड्यांच्या मार्गात बदल
भुसावळ-हजरत निजामुद्दन एक्स्प्रेस ही गाडी मंगळवार, 16 ऑगस्ट रोजी बडनेरा, अमरावती, नरखेड, इटारसीमार्गे वळवण्यात आली तर जोधपूर-चेन्नई एक्स्प्रेस ही गाडी 15 ऑगस्टला बडनेरा, नरखेड, नागपूर, बल्लारशाह मार्गे धावणार आहे. सिकंदराबाद-हिसार ही गाडी 16 व 17 ऑगस्टला बल्लारशाह, नागपूर, नरखेड, बडनेरा मार्गे वळवण्यात आली असून पोरबंदर-सेलू ही गाडी 14, 21 ऑगस्टला जळगाव, भुसावळ, इटारसी, नागपूरमार्गे जाणार आहे. सेलू-पोरबंदर एक्स्प्रेस ही गाडी 14 व 17 ऑगस्टला नागपूर, इटारसी, भुसावळ, जळगाव मार्गे वळविण्यात येणार आहे. याच दरम्यान दोन मालगाड्यांचे मार्गही बदल केले आहे. यात भिवंडी संकरेल ही गाडी 14 व 17 या दिवशी जळगाव, इटारसी, नागपूरमार्गे वळविण्यात आली तर संकरैल गुडूस टर्मिनल-भिवंडी ही मालगाड 14 व 17 ऑगस्टला नागपूर, इटारसी, भुसावळ, जळगाव मार्गे वळविण्यात येईल.