जयपूर : जयपूरमधील जालूपुरा परिसरात एका भंगाराच्या दुकानात तब्बल २ हजार आधार कार्ड आढळले आहेत. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलिसांनाही धक्का बसला आहे. एका व्यक्तीने गोणी भरुन रद्दी विक्री केली होती आणि त्या गोणीत जवळपास २ हजार आधार कार्ड आढळले.
आधार कार्डवर पोस्टल तिकिट
भंगाराचे दुकान असलेल्या इमरानने रद्दीची गोणी उघडून पाहिली असता त्यात आधार कार्ड आढळले. त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिकांना आणि पोलिसांना कळवण्यात आली. तर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोस्ट विभागाला देण्यात आली. गोणीत आढळलेल्या आधार कार्डवर ५-५ रुपयांचे पोस्टल तिकीट चिटकवली होती.
हे सर्व आधार कार्ड गेल्या वर्षीच्या तिमाहीत हक्कदारांकडे सुपूर्त करण्यासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, हे आधार कार्ड भंगारवाल्याच्या दुकानात पोहोचले. या आधारकार्डवर जानेवारी २०१७, मार्च आणि एप्रिल २०१७ रोजीचे आधार कार्ड असल्याचेही तारखांवरुन स्पष्ट होत आहे.