जळगाव : प्लॉटची खरेदी केली मात्र, पैसे न दिल्याने निलेश भंगाळे याला शुक्रवारी अपहर करण्यात आले होते त्यानंतर पोलीसांच्या भितीने निलेशला अपहरणकर्त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनसमोर सोडून पोबारा केला. यानंतर जिल्हा पेठ पोलीसात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी रात्रीच पाच संशयितांना अटक केली. तसेच त्यांना न्या. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले.
प्लॉटची खेरेदी केली परंतू पैसे दिले नाही म्हणून अभय भंगाळे याने निलेश भंगाळे याला जिवे ठार मारण्याची सुपारी शरद सपकाळे, प्रविण शिरसाळे, प्रविण तायडे, सतिष तायडे, सागर सोनवणे यांना दिली. यानंतर शरद याने इतर साथीदारांच्या मदतीने निलेश याला 11 डिसेंबर रोजी नविन बसस्थानकावरून अपहरण केले. मुलगा घरी परत येत नसल्याने घाबरलेल्या भंगाळे दांपत्यांनी शुक्रवारी पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांची भेट घेतली. डॉ. सुपेकर यांनी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, ही गोष्ट अपहरणकर्त्यांना कळल्यामुळे त्यांनी अपहृत नीलेशला दुचाकीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यासमोर सोडून दिले पळ काढला. यानंतर निलेश याच्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले. रात्रीच जिल्हा पेठ पोलीस कर्मचारी भास्कर पाटील व अन्य कर्मचार्यांनी प्रविण शिरसाळे, प्रविण तायडे, शरद सपकाळे, सतिष तायडे यांना अटक केली. त्यानंतर शनिवारी सकाळी पाचवा संशयित सागर भिमराव सोनवणे याला अटक केले. दरम्यान, दुपारी या पाचही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले.