‘भंग न पावणारे अभंग’ मध्ये तल्लीन झाले रोटरी सदस्य

0

जळगाव। चालला नामाचा गजर.. अवघे गर्जे पंढरपूर.. या अभंगाने सुरूवात झालेला ‘भंग न होणारे अभंग’ हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि रोटरी क्लब जळगावचे सर्व सदस्य त्यात तल्लीन झाले. जळगाव रोटरी क्लबतर्फे संतश्रेष्ठ शिरोमणी श्री नामदेव महाराज जयंतीनिमित्त गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाचे निरूपण व निवेदन प्रा.रेखा मुजूमदार यांनी केले. दिलीप चौधरी यांनी नामाचा गजर यासह इंद्रायणी काठी देवाची आळंदी हे अभंग सादर केले.

यांनी केले सादरीकरण
स्वाती डहाळे यांनी पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती व जेथे जातो तेथे तू माझा संगाती तर दिव्या चौधरी हिने अमृताहूनी गोड नाम तुझे देवा हा अभंग सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. समारोप कवी कुमुदाग्रज यांच्या ‘देवा हा संसार’ या अभंगाने झाला. तबल्यावर साथ संगत मिलींद देशमुख यांनी केली. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष डॉ.तुषार फिरके व मानद सचिव मुकेश महाजन यांची उपस्थिती होती. संकल्पना कार्यक्रम समिती प्रमुख अशोक जोशी यांची होती. आभार दिपीका चांदोरकर यांनी मानले.