भंडारा आग प्रकरण: राज्यातील सर्व शिशु केअर युनिटचे होणार ऑडिट

0

भंडार: येथील जिल्हा रुग्णालयातील शिशु केअर युनिटला रात्री 2 वाजेच्या सुमाराला भीषण आग लागली. या आगीत दहा नवजात बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.  या घटनेने संताप देखील व्यक्त होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. याघटनेनंतर राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण राज्यातील शासकीय रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी राज्य सरकारने ऑडिटचे निर्देश दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

राज्य सरकारने मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.