भंडारा-गोंदियातील यशानंतर रावेरमध्ये काँग्रेसचा जल्लोष

0

रावेर- भंडारा-गोंदीया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मधुकर कुकडे हे विजयी झाल्यने रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फटाके फोडून व पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरुण पाटील, सोपान पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, शहराध्यक्ष महमूदभाई मन्यार, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष समाधान साबळे, कार्यालयीन सचिव पिंटू महाजन, पांडुरंग पाटील, प्रवीण पाटील, विश्वनाथ पाटील, आर.डी.वाणी, एल.एम.तायडे, प्रवीण अग्रवाल, दामू साखरे, इमरान शेख, बाळू महाजन आदी राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.