भंडारा-गोंदियातील ३५ केंद्रावरील मतदान रद्द

0

भंडारा- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी आज पोटनिवडणूक होत आहे. सकाळपासून मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी मतदान सुरु झाल्यापासूनच ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड होत आहे. दरम्यान ३५ ठिकाणच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने या ठिकाणचे मतदान रद्द करण्यात आले आहे. मशीनमध्ये बिघाड झाल्यानंतर दुरुस्तीसाठी टेक्नीशियनला बोलविण्यात आले, मात्र दुरुस्ती होत नसल्याने अखेर या ठिकाणी मतदान रद्द करण्यात आले आहे.

दरम्यान भंडारा-गोंदिया मतदारसंघातील मतदान केंद्रावरील जवळपास ४५० मतदान यंत्र बंद असल्याचे आरोप प्रकास आंबेडकर यांनी केले आहे.