भंडारा: पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पडल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. भंडारा आणि गोंदियात तर तब्बल ४५० इव्हीएम बंद असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. इव्हीएम बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांना ताटकळत राहावे लागत आहे. सातत्याने येणाऱ्या तक्रारीमुळे, गोंदियातील 35 केंद्रांवरील मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते वृत्त फेटाळले आहे.
३५ केंद्रावरील मतदान रद्द केल्याची माहिती आल्यानंतर, त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांनी स्पष्टीकरण देत, कुठेही मतदान रद्द झाले नसल्याचे सांगितले. शेवटचा मतदार मतदान करेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरुच राहील, असे अभिमन्यू काळे यांनी सांगितले.