रावेत : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान पंधरवडा’ या उपक्रमांतर्गत सांगुर्डी (ता. खेड) या ठिकाणी स्वच्छता जनजागर रॅली तर श्री. क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेंतर्गत भंडारा डोंगरावर ठिकठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
60 विद्यार्थ्यांचा उपक्रमात सहभाग
या स्वच्छता मोहिमेत महाविद्यालयातील 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद तसेच सदस्य नाटक पाटील यांनी विद्यार्थ्यांना भंडारा डोंगराचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले. भक्ती आणि शक्तीच्या माध्यमातून करण्यात येणारा संकल्प हा नक्कीच पूर्णत्त्वाला जातो. भक्तीचा मार्ग हा अतिशय श्रेष्ठ आहे. या मार्गाचा अवलंब करून आपण नक्कीच समाज परिवर्तन घडवून आणू शकतो, असे त्यांनी सांगितले.