जळगाव । थोर भुमीपुत्र भंवरलालभाऊ जैन यांच्या पहिल्या स्मृतीदिनी ‘जनशक्ति’ परिवारातर्फे विकसित करण्यात आलेल्या http://www.bhavarlaljain.com या संकेतस्थळाचे लोकार्पण आज जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ‘जनशक्ति’चे संपादक कुंदन ढाके, कार्यकारी संपादक शेखर पाटील, व्यवस्थापक एस.आर. पाटील, भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, ‘जनशक्ति डिजीटल’चे तुषार भांबरे, सौरभ पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते.
अद्ययावत माहिती
दिवंगत भंवरलालभाऊ जैन यांच्या जीवन कार्याची प्रेरणादायी माहिती जगापर्यंत पोहचवण्यासाठी ‘जनशक्ति’चे कार्यकारी संपादक तथा ‘टेकवार्ता’चे संपादक शेखर पाटील यांना या पोर्टलची संकल्पना सुचली. याला ‘जनशक्ति’चे संपादक कुंदन ढाके यांनी प्रोत्साहन दिले तर अशोकभाऊ जैन यांनी यांनी होकार दिला. यातून हे पोर्टल आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. हे संकेतस्थळ बहुभाषिक असून यावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधील कंटेंट अपलोड करण्यात येणार आहे. यात मोठ्या भाऊंच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांची भाषणे, लेख, वेळोवेळी व्यक्त केलेले मुक्त विचारधन, त्यांचे साहित्य, त्यांच्याबाबत लोकांची मनोगते, बातम्या, कविता आदींना विविध पोस्टच्या माध्यमातून जगासमोर सादर करण्यात येणार आहे. दुर्मिळ छायाचित्रांनी सज्ज असणारा उत्तमोत्तम मजकूर, व्हिडीओज आदींचाही यात समावेश असणार आहे. या संकेतस्थळांवरील सर्व माहिती फेसबुक, ट्विटरसह सर्व सोशल प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात
येणार आहे.