भक्तीचा विस्तारता परीघ

0

हल्ली आपल्राकडे अध्रात्म, धर्म, श्रद्धा रांसारख्रा शब्दांना बरेच चांगले दिवस आले आहेत. जिकडे-तिकडे सत्संग, प्रवचन, रोग, शिबिरं आरोजित केली जात आहेत. त्राला हजारो भाविकांची उपस्थिती लाभते आहे. कुणा स्वामी-बाबा-महाराज-पुज्र रांच्रा अनुषंगाने काही वाद उत्पन्न झाला, तर त्राच्रा बाजूने वादात लोक मोठ्या संख्रेने उतरत आहेत. नाणीजच्रा नरेंद्र महाराजासंबंधी धर्मदंडाचा वाद झाला, तेव्हा मुंबई, औरंगाबाद विमानतळावर निदर्शने झाली. तिथे लाठीमार झाला. दगडफेकही झाली. रामदेवबाबांबद्दल वृंदा करातांनी आक्षेप नोंदवताच देशभर त्रांचे पुतळे जाळले गेले. रा बुवा-बाबा-गुरू महाराजांच्रा प्रतिष्ठेच्रा रक्षणार्थ अशारीतीने हजारो भक्त सक्रिर होऊ लागले आहेत. भक्तांनी आणि भाविकांनी संघटित होऊन अशाप्रकारे सक्रिर होण्राची पद्धतच अलीकडे रूढ होताना दिसते आहे. बुवा-बाबांच्रा चरणी ज्रांनी आपल्रा श्रद्धा अर्पिल्रा आहेत, अशा लोकांची संख्राही फारच वाढलेली दिसते आहे. एक संघटित शक्ती उभी राहते आहे. बुवा-बाबांबद्दल कुणी काही बोललं तर त्रांच्रा भावना-श्रद्धा दुखावू लागतात. रा सार्‍रा भानगडीत आत्मशांती, सहिष्णुता, अहिंसा, सदाचार वगैरे शिकवण गळून पडते. आधुनिक विज्ञानानं जग जवळ आलंर. बारपास होत हृदराला भिडलंर. आरुष्राला गती देणार्‍रा, आनंद देणार्‍रा अनेक गोष्टी माणसांच्रा जवळ आल्रात. तथापि, अनेक सामाजिक, सांसारिक, शारीरिक व्राधी-व्रथांनी माणसाला घेरलंर. माणसं जवळ असली, तरी मनानं दूर जाताहेत. अशावेळी देव, धर्म, अध्रात्म राचा त्राला आधार, दिलासा वाटतोर. पण ही गरज ओळखून कांहींनी त्राचा बाजार मांडलार. सत्संग हा उपचार नाही, ती सहजप्रवृत्ती आहे. तशीच असली पाहिजे. खरंतर ‘शेवटचा दिस गोड व्हावा’ किंवा मोक्षासाठी देवधर्म कार्र नाही. जे आपण अनुभवत नाही त्रासाठी सत्संग नाही. जे कांही अनुभवतो, जगतो त्रातील विकारांचा नारनाट करण्रासाठी सत्संग, अध्रात्म आहे. असा सत्संगच मूर्तितल्रा देवाला, धर्माला, अहंकाराला भडभूंजा ठरवणार्‍रा देवमाणसाचे दर्शन घडवतो.

सध्रा अध्रात्माच्रा नावाने जे काही प्रकार चालू आहेत, ते पाहता महाराष्ट्रातल्रा अनेक समाजसुधारकांनी, संतांनी, प्रबोधनकारांनी निर्माण केलेला प्रबोधनकार इतिहासातून लुप्त झाला की कार आणि इथल्रा माणसांनी हा सारा संस्कार पाहता पाहता पुसून टाकला की कार? असं वाटून जावं, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात आणि देशात अध्रात्माची जी नवी आवृत्ती बुवा-बाबा-गुरू-महाराज-स्वामी-पुज्र रांच्रा रूपाने अवतरली आहे आणि तिला जो उदंड प्रतिसाद लाभतो आहे, ती पाहता रा मंडळींनी ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथा यांसारखे धार्मिक ग्रंथ पचवून एक जोरदार ढेकर दिलेली दिसते. इथे प्रश्‍न बाबा-बुवा-महाराज रांच्राबरोबरच जीवनाचे अंतिम सत्र त्रांच्रा संदेशात सापडते असे मानणार्‍रांचा आहे. कालपर्रंत खेडूत, ग्रामीण, अशिक्षित, गरीब वर्गाच्रा श्रद्धांना- विधींना पूजांना, परंपरांना, ‘अंधश्रद्ध’ म्हणणारा शहरी सुशिक्षित तुलनेने सुस्थिर पांढरपेशा, मध्रमवर्ग, अशा प्रबोधनाची विचाराची, विवेकाची कास सोडून बाजू बदलू पाहतो नि सत्संगांना नि प्रवचनांना उपस्थिती लावू पाहतो आहे. रा वर्गाने कालपर्रंत ‘अंधश्रद्धांमुळे मागासलेले’ असं ज्रांचे वर्णन केलं आहे ते आणि हे, मांडीला मांडी लावून ‘सश्रद्ध’ बनले आहेत. सुशिक्षितांच्रा श्रद्धांना ‘अंधश्रद्धा’ म्हणाल तर खबरदार, असा आवाजही लावला जातो आहे. ‘आमच्रा त्रा श्रद्धा आणि इतरांच्रा त्रा अंधश्रद्धा’, अशी रा वर्गाने सोपी व्राख्रा करून टाकली आहे. त्रामुळेच सत्संगांना हजेरी लावणं, आस्था-संस्कार-जागरण-साधना रा धार्मिक-आध्रात्मिक चॅनेल्सवरील प्रवचन ऐकणं, त्रांच्रा अनुषंगाने निर्माण झालेल्रा वादात ‘भक्त’ नात्राने सामील होणं असे कारनामे हा वर्ग करू लागला आहे. शिक्षणाचा, शहाणपणाचा, रोग्र-अरोग्र ठरवण्राचा मक्ता आपल्राकडे आहे, असे मानणारा हा वर्ग पाहता पाहता नवआध्रात्मिक लाटेत सामील झाला आहे. ही नवी भूमिका बजवारला सुरुवात केल्रापासून अध्रात्म, धर्म, श्रद्धा, भावना, आस्था रा शब्दांना नवा अर्थ नि नवं बळ लाभू लागलं आहे. आपल्रा धर्म, श्रद्धा, अस्मिता रातील गैरबाबींकडे कुणी बोट दाखवलं की, एकदम भावना दुखावल्रा जातात. हा कांगावा आहे. ‘श्रद्धा ही नीतीला पर्रार नाही’, असं महात्मा गांधी म्हणत. मानवी व्रवहाराच्रा नावानं दिवसभर अशुभं करोमी करारचं अन् सांजवातीला शुभंकरोती म्हणारचं, ही विसंगती देव-धर्माला बदनाम करणारी आहे. अंतरीचा ज्ञानदीप सतत तेवत असेल, तरच रोजचं जगणंही उजळून निघेल. त्रासाठी कुणाची करुणा भाकारची अजिबात गरज नाही. निरत साफ असली की बस्स! ती श्रद्धा, अस्मिता दुखवल्रा जाणार्‍रांच्रात असते कां? संत ज्ञानेश्‍वर ‘अमृतानुभव’ ग्रंथात राबाबत नेमका प्रश्‍न विचारतात- ‘देव देऊळ परिवारू। की जे कोरुनी डोंगरु । तैसा भक्तीचा देव्हारू । का न व्हावा ॥’ डोंगर फोडून, दगड कोरुन देव देवालर निर्माण करणार्‍रा माणसाला आपल्रातल्रा भक्तीचा म्हणजेच नीती-धर्माचा व्रवहार प्रकट करण्रात अडथळा रेण्राचं कारण नव्हतं. परंतु, देव-धर्माच्रा नावाने पोट जाळणार्‍रांनी देवाला आकारात आणि धर्माला कर्मकांडामध्रे अडकवलं. आधुनिक काळात झालेल्रा भौतिक प्रगतीतून लोंकामध्रे भोगवादी वृत्ती वाढते आहे. चंगळ वाढते आहे. एकीकडे मौजमजा करारची, वाट्टेल त्रा मार्गाने पैसा-संपत्ती मिळवारची आणि दुसरीकडे पुण्र गाठीशी बांधण्राचा ‘शॉर्टकट’ म्हणून बाबा-बुवांचा हा सत्संग करारचा, ही वाढती वृत्तीही हे प्रस्थ वाढवण्रास कारणीभूत आहे. उच्चभ्रू वर्गातील सुशिक्षित डॉक्टर्स, इंजिनीअर्स, वकील, शास्त्रज्ञ, व्रापारी, चित्रतारका, खेळाडू, राजकारणी रा मंडळींनी बुवांच्रा चरणी लीन होऊन हे प्रस्थ वाढवण्राला सहकार्र केलं आहे. रा सार्‍रातून बुवा-बाबा महाराजांचा सत्संग हा ‘स्टेटस सिम्बॉल’ झाला आहे. सामान्र माणसं त्राचं अनुकरण करताहेत.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला सातशे वर्षांची संतपरंपरा लाभलीर. पण, तुकडोजी महाराजांनंतर ती संपली. महाराष्ट्रात आज संत म्हणण्राच्रा लारकीचा एकही आध्रात्मिक पुरुष नसला, तरी परमपुज्र, सद्गुरू, स्वामी-बुवा-महाराज रांची संख्रा दिवसागणिक वाढते आहे. त्रांच्राही देवस्थानचे अड्डे थाटात उभे राहत आहेत. लोकांच्रा भाबड्या भक्तिभावाची पिळवणूक चाललीर. लाखो रुपरांच्रा त्रात उलाढाली होत आहेत. अध्रात्म सत्संग राला धंद्याचं स्वरूप आलंर. वारकरी सांप्रदारातही त्राचं वारं शिरलंर. सत्संगासाठी हे बुवा-बाबा-बापू सत्संगासाठी लाख-लाख रुपरांच्रा सुपार्‍रा घेतात. ह्या सुपारीबरोबरच सत्संगासाठीच्रा मंडपाला, लाऊड स्पीकरला, प्रसिद्धीला त्राहून अधिक पैसा खर्च केला जातो. तो काही रा बुवा-बाबांच्रा खिशातला नसतो. तो कुठून आणला जातो? कोण देतो? राची विचारपूस बुवा महाराज करतात कां? मिळालेल्रा पैशाचा हिशोब कधी कुणाला देतात कां? कूमार्गातले दोन नंबरचे धंदे करणारे आणि स्थानिक राजकारणी रांचा हा पैसा असतो. राहिलेला पैसा विक्रीकर, आरकर, बँक अथवा नगरपालिकेच्रा कर्मचार्‍रांना कमिशन देऊन ‘स्मरणिका’ रूपात जमवला जातो. जाहिरातदारांच्रा रा दातृत्वाची किंमत त्रांच्रा गैरव्रवहाराकडे दुर्लक्ष करून मोजावी लागते. ही वस्तुस्थिती नाकारता रेणार नाही. पण सत्संगाचे मोठमोठे सोहळे भरवून आपल्रा भक्तीचे आणि भक्तांच्रा सांघिक शक्तीचे दर्शन घडवण्राची संधी हे बुवा-बाबा-महाराज सोडत नाहीत.

बुवा बाबांच्रा सत्संगात असते तरी कार? धार्मिक ग्रंथ आणि पौराणिक कथांमधून जेवढा संदेश देता रेईल, तेवढा दिला जातो आणि लोकांंकडून तो घेतला जातो. बर्‍राचवेळा हे संदेश सरधोपट असतात. संदिग्ध असतात. गुरुंच्रा गोष्टी वेल्हाळ शैलीमुळे संदेशापेक्षा मनोरंजनाचाच अनुभव जास्त रेतो. कुणी लक्षपूर्वक ‘टीव्हीस्टार बाबांची’ प्रवचने ऐकली, तर जवळपास डोक्रात काही प्रकाश पडत नाही. मोह-मारा-आत्मा-ईश्‍वर-सुख-शांती-समाधान-परमात्मा-तत्त्व, असा अद्भुत शब्दांचा पाऊस आपल्रावर पडतो आणि पुन्हा पुन्हा पडत राहतो. भक्त त्रातच चिंब भिजतो आणि भक्तिरसात डुंबू लागतो. डुंबताना त्राला गुूचा आधार असतो. त्रामुळे तो आधार सुटू नरे एवढाच त्राचा ध्रास असतो. त्रामुळे अशा ‘स्वरंभू’ परमपुज्रांची पलटणच उभी राहतेर. खरं तर देव-धर्म जागवण्रासाठी कुणाही मध्रस्थाची गरज नसते. त्रासाठी गुरू-सद्गुरू-परमपुज्र-स्वामी-महाराज-बुवा-विद्यापती हे तुरे झडले पाहिजेत. माणसात देव आहे असं म्हणारचं अन् त्रालाच आपला मोठेपणा मिरवण्रासाठी झुकवारचं, वापरारचं, हा कसला सत्संग? हे तर देवाचे दलाल अन् धर्माचे ‘हवाला’दार! मग प्राणप्रतिष्ठेची पूजा करून मूर्तीत देवत्व घालणारा आणि उत्तरपूजेने ते देवत्व काढणारा भटजी हा देवांपेक्षाही श्रेष्ठ म्हटला पाहिजे. मग तो खांद्याला झोळी लटकवून दारोदार का फिरतो, राचा जरा विचार करा. देव धर्माच्रा पूजेसाठी एक मस्तक आणि दोन हस्तक पुरेसे असतात. त्रांची रुती मनापासून केली की, देव पावला, धर्म जागलाच समजा! त्रासाठी कुणाचीही गरज नाही. मग, हा विस्तारत जात असलेला भक्तीचा परीघ आपोआपच कमी होईल!

हरीश केंची – 9422310609