भक्तीच्या मार्गाने ईश्‍वराच्या निकट जाणे शक्य

0
साध्वी डॉ. चंदनाजी यांचे मत : उवसग्गर जापची पूर्णाहूती
पिंपरी-चिंचवड : भक्तीच्या मार्गाने जाणारी व्यक्ती ईश्‍वराच्या निकट पोचते. दिवसरात्र प्रत्येक व्यक्ती ही पैशाच्या मागे धावत आहे. आपल्याला काय प्रिय आहे. पद, प्रतिष्ठा की पैसा? तुम्हाला जीवनात सर्व काही मिळू  शकेल. फक्त श्रध्दाभावनेने ईश्‍वराची आराधना करा, असे मत साध्वी डॉ. चंदनाजी यांनी रविवारी चिंचवड येथे व्यक्त केले. चिंचवडगाव येथील कल्याण प्रतिष्ठानमध्ये जैन चातुर्मासांतर्गत आयोजित  41 दिवसांच्या ’उवसग्गहरं’ जापची पूर्णाहुती झाली. त्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना  साध्वी डॉ. चंदनाजी बोलत होत्या. साध्वी डॉ. अक्षयज्योतीजी, कलावतीजी, उपासनाजी, नवकिर्तीजी, योगलब्धीजी, अक्षदाश्रीजी आदी उपस्थित होते.
‘जितो’च्या उपक्रमाची माहिती
चैतन्य लुंकड यांचे आज 28 उपवास होते. ’जितो’ संस्थेच्या उपक्रमांची माहिती उद्योजक राजेश साकला,  ’जितो’ चे शहराध्यक्ष राजेंद्र जैन, सेक्रेटरी संतोष धोका यांनी दिली. या प्रसंगी  ’जितो’  संस्थेच्या उपक्रमांची माहिती देणारी ध्वनीचित्रफीत  दाखविण्यात आली.  नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, प्रा. अशोक पगारिया, चिंचवडगाव जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप नहार, कल्याण प्रतिष्ठानचे अशोक बागमार, उमेश भंडारी, अशोक मंडलेचा, राजेंद्र लुंकड आदी उपस्थित होते. रमणलाल लुंकड आणि मनोहर लोढा यांचे विशेष सहकार्य मिळाले. नंदकुमार लुणावत यांनी कार्यक्रमाचे तर, मंगल कलश लिलाव बोलीचे सूत्रसंचालन मनोज बाफना यांनी केले.