रावेर। येथील तक्षशिला बुध्द विहारात भगवान गौतम बुध्द यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष सुधिर पाटील यांच्या हस्ते दिपपूजा करण्यात आली. पाटील म्हणाले की, भगवान बुध्दांनी जगाला शांतीचा संदेश दिला असून त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा. यावेळी कामगार नेते दिलीप कांबळे, नगरसेविका रंजना गजरे, अॅड. योगेश गजरे, नगरसेवक जगदिश घेटे, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष पंकज वाघ, समता सैनिक दलाचे तालुकाप्रमुख बाळू रजाने, प्रकाश महाले यांनी पुष्पपूजा केली. बौध्दाचार्य सदाशिव निकम यांनी उपस्थित बौध्द उपासकांना त्रिशरण पंचशिल दिले.
पुतळ्याचे केले पूजन
येथील डॉ. बाबासाहेेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी दिलीप कांबळे, भारिप तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, अॅड. योगेश गजरे, जगदिश घेटे, बाळू रजाने, प्रकाश महाले, त्र्यंबक वाघ, संदिप हिरोळे, सदाशिव निकम, दिपक नगरे उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी दिलीप कांबळे, अॅड. योगेश गजरे, जगदिश घेटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नगरसेवक आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद, माजी नगरसेवक महेंद्र गजरे, मिना शिरतुरे, वंदना गायकवाड, संदिप हिरोळे, राहुल गाढे, पुंडलिक कोंघे, महेंद्र लोंढे, प्रकाश महाल, अॅड. कोचगे, तेजल तायडे, सुकेशनी बोदडे, सरला रायमळे, भालेराव आदी उपस्थित होते.