भगवान परशुराम जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम

0

जळगाव। बहुभाषिक ब्राम्हण संघ व समस्त ब्राम्हण संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून 27 व 28 एप्रिल या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्रीकांत खटोड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बहुभाषिक ब्राम्हण संघांचे सुरेंद्र मिश्रा, अजय डोहळे, लेखराज मिश्रा, अशोक वाघ, पियुष रावल, तुषार याज्ञीक, राहुल कुलकीर्णी, दिलीप तिवारी आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. माहिती देतांना खटोल पूढे म्हणाले की, 2010 पासून भगवान परशूराम जयंतीनिमित्त बहुभाषिक ब्राम्हण समाज एकत्र येवू लागला आहे. जळगावात जयंती साजरी झाल्यानंतर औरंगाबाद येथे मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली जात आहे. त्यामुळे भगवान परशुराम जयंतीनिमित्त शहरात दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

27 एप्रिलला असे असणार कार्यक्रम
भगवान परशुराम जयंतीनिमित्त 27 एप्रिल रोजी बहुभाषिक ब्राम्हण संघ व परशुराम सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यामाने सकाळी 9 वाजता महाबळ येथून मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. रॅली महाबळमधून आकाशवाणी चौक, रिंगरोड, छत्रपती शिवाजी चौक, नेहरू पुतळा, बालाजीपेठ, सुभाष चौकमार्गे ब्राम्हण सभा येथे समारोप होणार आहे. यानंतर सायंकाळी 5.30 वाजता ब्राम्हण सभा येथे अतुलभगरे यांचे भगावान परशुराम यांच्यावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी 7 वाजता महाबळ कॉलनी चौकात बहुभाषिक ब्राम्हण संघ व परशुराम सेवा समितीतर्फे ब्राम्हण आदीवासी संघाचे अध्यध्य प्रविण जेठेवाड यांचे व्याख्यान होणार आहे, अशी माहिती खटोड यांनी दिली.

28 एप्रिलचे कार्यक्रम
28 एप्रिल रोजी जयंतीनिमित्त शहारातील महाबळ कॉलनी, गणेश कॉलनी, शिवाजी चौक, आयोध्यानगर, बालाजीपेठ या पाच मुख्य चौकांमध्ये समाज बांधवांच्यावतीने भगवान परशुराम यांची प्रतिमापुजन केले जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता जुने जळगावातील श्रीराम मंदिर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यात समाज बांधव सहपरिवार शोभायात्रेत सहभाग होतील. शोभायात्रेत 70-70 ढोल-ताश्यांचे दोन पथक सहभागी होणार आहे. यात 5 ते 15 वयोगटातील चिमुकले वेगवेगळ्या वेशभुषेत सहभागी होणार आहेत. त्यात उत्कृष्ट वेशभुषा परिधान केलेल्या चिमुकल्यास बक्षीस देण्यात येणार आहे. रात्री 8.30 वाजता भगवान परशुराम प्रतिमा पुजन व महाआरती होणार आहे. यावेळी हभप मंगेश महाराज जोशी, हभप दादा महाराज जोशी, महेशकुमार त्रिपाठी, भरत अमळकर, गजानन जोशी, अशोक जोशी, सुशिल अत्रे, राधेश्याम व्यास, संजय व्यास, गोंविद ओझा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.