जळगाव – शहरातील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमीत्त दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित सूर्योदय वाङमय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे. स्व. कांताबाई भवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ तेराव्या वर्षाचा सूर्योदय सेवा पुरस्कार खानदेशातील नामवंत कवी भगवान भटकर (जळगाव) यांना जाहीर करण्यात आला. यापूर्वी व्यंकटराव रणधीर, गिरिजा कीर, प्रा.पुरुषोत्तम पाटील, शैलजा काळे, डॉ.प्रल्हाद वडेर, अपूर्वा सोनार, डॉ.अनुपमा उजगरे, प्रा.नारायण कुलकर्णी-कवठेकर, प्रभा गणोरकर, एकनाथ आव्हाड, अशोक कोतवाल, विनीता एनापुरे या मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.
स्व.बन्सिलाल-शिवराज हस्तीमल जैन, स्व.कांतीलाल हिरालाल चोरडीया यांच्या स्मरणार्थ दुस-या वर्षाचा सूर्योदय साहित्य भूषण पुरस्कार खानदेशातील नामवंत कवी अशोक नीलकंठ सोनवणे (चोपडा) यांना जाहीर करण्यात आला असून यापूर्वी या पुरस्काराने डॉ.विजया वाड यांना गौरवण्यात आलेले असून या दोन्ही पुरस्काराचे स्वरूप रूपये अकरा हजाराचा धनादेश, गौरवपत्र असे असून पुरस्कार प्रदान सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून सर्वश्री माया धुप्पड, प्रदीप निफाडकर, प्राचार्या डॉ. देवानंदा सांखला, डॉ. संजीव सोनवणे या निवड समितीने ही निवड केलेली आहे.