भगवान लोंढे यांचे निधन

0

पिंपरी-चिंचवड : भोसरीतील महात्मा फुले जागृती शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष, पीसीएमटीचे निवृत्त तिकीट तपासणीस भगवान आनंदराव लोंढे (वय 76) यांचे सोमवारी (दि. 7) निधन झाले. नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांचे ते सासरे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष वसंत (नाना) लोंढे यांचे ते धाकटे बंधू होत.

त्यांच्या मागे एक भाऊ, तीन बहिण, पत्नी, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधीवेळी महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, विलास लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आदींसह नगरसेवक व विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या.