मुक्ताईनगर। राज्य शासनाचा वृक्षलागवडीच्या संकल्पास प्रतिसाद देत कुर्हा काकोडा येथील भगवा फाऊंडेशनच्या युवकांनी वृक्ष लागवडीवरच न थांबता लावलेले वृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. शासनाच्या वतीने चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ ठेवले असून या उपक्रमात शासनाचे सर्व विभाग व स्वयंसेवी संस्थांना सुध्दा सहभागी करुन घेतले.
यांच्या हस्ते झाले वृक्षारोपण
भगवा फाऊंडेशनच्या युवकांनी सुध्दा या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कार्यकर्त्यांनी विविध जातीच्या पाचशे वृक्षांचे घरोघरी जाऊन वाटप केले. तसेच सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपणही केले. ग्रामपंचायत उपसपंच अनिल पांडे, डॉ. गजानन खिरळकर, कुर्हा पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार सुधाकर शेजोळे, अवदूत भूते, शंकर मोरे, गणेश भोई, रवि गोरे, भोला खिरळकर, काशिनाथ महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
प्रोत्साहनपर बक्षीस देणार
लागवड झालेल्या झाडांचे संवर्धन होण्यासाठी ज्या घरासमोर झाडाची लागवड झाली आहे. त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचा मानस फाऊंडेशनतर्फे करण्यात आला आहे. प्रमोद बोंडे, राहुल भोईटे, नितीन खिरळकर, निलेश नेमाडे, राजेश गलवाडे, गजानन बेलदार, रामेश्वर भोई, विकास कांडेलकर, हर्षल महाजन, गोविंदा पाटील, प्रविण बेलदार, सागर गंगतीरे, पिंटू कुकलारे यांचे सहकार्य लाभले.