बँकॉक सुरक्षितता हा मुद्दा पोलिसांच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा असतो त्याहीपेक्षा त्यादृष्टीने खडा पहारा देणार्या पोलिसांची संख्या किती हा भेडसावणारा प्रश्न असतो. मात्र, यावर थायलंड सरकारने भटक्या कुत्र्यांच्या माध्यमातून ठोस तोडगा काढला आहे. कुत्र्यांना जॅकेट घालून त्यावर कॅमेरे बसवून पहारा देण्याची शक्कल लढवली आहे.
थायलंड सरकारने या कुत्र्यांच्या मदतीने रस्त्यावर पहारा देण्याचा निर्णय घेतला आहे. या कुत्र्यांना कोणतेच प्रशिक्षण न देता त्यांना थायलंडमधील विविध विभागांचे चौकीदार बनवण्यात आले आहे. या कुत्र्यांना एक जॅकेट घालण्यात येते. या जॅकेटवर पुढील बाजूस कॅमेरा बसवण्यात आला असून हे कुत्रे जेव्हा भुंकण्यास सुरुवात करतील तेव्हा हे कॅमेरे आपोआप सुरू होतील. या कॅमेर्यांच्या मदतीने थायलंड सरकारला रस्त्यांवर चालणार्या विविध हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे, अशी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.