जळगाव । भटके विमुक्त हक्क परिषदेच्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी शालीक पवार यांची तर नरेश बागडे यांची सह समन्वयक पदी निवड जाहीर नुकतेच राज्यात भटके विमुक्त समाजाचे प्रश्न त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व राज्यात स्वाभीमानाची तसेच दादा इंदाते आयोगाची जाणीव जागृती करुन देण्यासाठी भटके विमुक्त हक्क परिषद राज्यात प्रभावीपणे कार्ये करीत आहे. भटके विमुक्त हक्क परिषदेचेवतीने राज्यात प्रभावी संघटन निर्माण केले जात असून जळगाव जिल्हा कार्यकारिणी विस्ताराचा कार्यक्रम भाजपा कार्यालयात नाशिक विभागाचे मुख्य समनव्यक पुरुषोत्तम काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
निवड कार्यक्रमात यांची होती उपस्थिती
शालीक पवार यांची भटके विमुक्त हक्क परिषदेच्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी तर नरेश बागडे यांची सह समन्वयक पदी सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. ही एक सामाजिक चळवळ असून सर्व 51 जातीच्या समाज प्रतिनिधींनी एकत्र यावे समाजाच्या विकासासाठी मतभेद विसरावे तसेच हक्क परिषदेच्या वतीने ज्या मागण्या राज्य शासनाकडे हक्क परिषदेच्या वतीने लावून आहेत. पुढील कालावधीत देखील भटके विमुक्तांना केंद्रात स्वतंत्र डी.एन.टी. प्रवर्ग तयार करावा. या करीता केंद्रस्तरावर हक्क परिषद जोरदार लढा निर्माण करणार असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन काळे सर यांनी केले. वसंत गुजाळ, रामकृष्ण मोरे, राजुभाऊ खेडकर, साहेबराव गोसावी, जगदिश चित्रकथी आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संदीप घुगे यांनी केले तर सूत्रसंचालन शालिक पवार यांनी केले. कार्यक्रमास ज्ञानेश्वर गुमाणे, सुनील धनगर, विनोद शिंदे, राजेंद्र गुजाळ, मनोहर मोरे, विनय फुलपगार, सुहास जोशी, किरण जोगी, इ. उपस्थित होते. जिल्हा कार्यकारिणीत नितीन भोई, बाळासाहेब गोसावी, संदीप घुगे, किशोर सानप, किरण जाधव, उमेश राठोड, निलेश चव्हाण यांची जिल्हा प्रसिध्द प्रमुखपदी अनिल जोशी यांची तर निर्मला शिंदे यांनी महिला आघाडी प्रमुख पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. राज्यात भटके विमुक्त समाजाचे प्रश्न त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व राज्यात स्वाभीमानाची तसेच दादा इंदाते आयोगाची जाणीव जागृती करुन देण्यासाठी भटके विमुक्त हक्क परिषद राज्यात प्रभावीपणे कार्ये करीत असल्याने नवनिर्वाचित सदस्यांनी सांगितले. यावेळी निवड झालेल्या सदस्यांना अभिनंदन करण्यात आले.