भटके, विमुक्त हक्क परिषदेची आज बैठक

0

जळगाव। शासकीय अजिंठा विश्रामगृहात भटके, विमुक्त हक्क परिषदेची जिल्हास्तरीय बैठक दि. 16 रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस नाशिक विभागाचे मुख्य समन्वयक पुरुषोत्तम काके, विभागीय समन्वयक वसंतराव गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी रावेर लोकसभा क्षेत्राची कार्यकारीणी घोषीत केली जाणार आहे. तसेच आगामी भटक्या विमुक्तांच्या जिल्हा मेळाव्याच्या आयोजनावर चर्चा होईल.

असा आहे बैठकीचा अजेंडा
बैठकीत केंद्र सरकारने कर्मवीर दादा इधाते यांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या राष्ट्रीय भटके विमुक्त घुमन्तु व अर्धघुमन्तू जनजाती आयोगाबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार असून हक्क परिषदेच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात येईल. तरी जिल्ह्यातील भटके विमुक्त हक्क परिषदेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी तसेच भटके विमुक्तांच्या समस्यांवर सातत्याने अभ्यास करुन उपक्रमशिलता दाखविणार्‍या, वैयक्तिक पातळीवर कार्यरत असणार्‍या आणि स्वयंसेवी सस्थांच्या माध्यमामातून भटके विमुक्त समाज घटकांना विविध योजनांचे मार्गदर्शन करुन त्यांच्या उर्जीतावस्थेसाठी प्रयत्नरत असणार्‍या जिल्हाभरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व अध्यक्ष यांनी दि. 16 जुलै रविवार रोजी दुपारी 2 वाजेला उपस्थिती द्यावी असे आवाहन समन्वयक शालीक पवार, सहसमन्वयक नरेश बागडे, संदीप घुगे, अनिल जोशी, बाळासाहेब गोसावी, निर्मलाताई, सानप, निलेश चव्हाण, किरण जाधव, समाधान निळे, नितीन भोई, प्रकाश पाटील यांनी केले आहे.