भटके-विमुक्त मुक्ती सन्मानदिन साजरा
सर्वानुमते 8 ठराव मंजुर करुन मुख्यमंत्र्यांकडे ठरावाची प्रत पाठविण्रात आली
नंदुरबार । भटके-विमुक्त हक्क परिषदेतर्फे 31 ऑगस्ट भटके-विमुक्त मुक्ती सन्मान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्वानुमते ठराव मंजुर करुन विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्रांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. निवेदनावर पुरुषोत्तम काळे, सुपडू खेडकर, रामकृष्ण मोरे, मनोज चव्हाण, प्रकाश सुळ, मोरसिंग राठोड, तुकाराम लांबोळे, राजेंद्र गुंजाळ, साहेबराव गोसावी, पोपट शिंदे, अशोक वैदू, विक्की वैदू, योगेश खेडकर, अरविंद खेडकर, शंकर वैदू, प्रकाश काळे, राजु जाधव, धर्मेंद्र भारती, सावळीराम करीया, दिलीप ढाकणेपाटील, राजुआण्णा साठे, मोरेसर, माखा कोळेकर, योगेश चित्रकथी, भाऊसाहेब वंजारी, भागा ठेलारी, बारकु शिरोळे, दुर्गेश वैदू, चंदू बेलदार आदींच्या सह्या आहेत.
खालील ठराव मंजूर
सभेत केंद्र सरकारने ओबीसींना क्रिमिलेअर मर्यादा वाढविल्राने अभिनंदनाचा, बार्टीच्रा धर्तीवर भटके-विमुक्तांसाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात यावी, जात पडताळणीचे प्रश्न मार्गी लावण्रात रावे, कारमस्वरुपे आरोग नेमण्रात रावे, उत्पन्न मर्यादेतून सरसकट मुक्त करावे, जात वैधता प्रमाणपत्राकरीता 2008 चा शासन निर्णय पुनर्जिवित करावा, भटके विमुक्त बेघरांसाठी घर मिळवून द्यावे, प्राथमिक व माध्यमिक (इंग्रजी, मराठी माध्यमाच्या) निवासी शाळांची निर्मिती करण्यात यावी आदी ठराव मंजुर करुन ठरावाची प्रत जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
शोभारात्रा रथ
सन 1871 साली ब्रिटीशांनी काढलेल्या गुन्हेगारी जमात कायद्यातून 31 ऑगस्ट 1952 रोजी भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडीत नेहरु यांनी मुक्त केल्याने सदरचा दिवस या जाती-जमातीकडून मुक्त सन्मान दिन म्हणून संपूर्ण देशात वेगवेगळ्या ठिकाणी आनंदाने साजरा केला जातो. नंदुरबार येथील जुने तालुका कवायत मैदानात शोभायात्रा रथातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन पोलीस उपनिरीक्षक डी.पी.गुळींग यांच्या हस्ते करण्यात आले.