भटक्या कुत्र्यांचा त्रास

0

पिंपरी । मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा शहरातील नागरिकांना त्रास होत आहे. एखाद्या सेलिब्रिटी, राजकीय पुढारी किंवा मोठ्या अधिकार्‍याला ही मोकाट कुत्रे चावणार नाहीत; तोपर्यंत महापालिका प्रशासन काहीच करणार नाही का, असा संतप्त सवाल महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून निगडी येथील नागरिक दीपक खैरनार यांनी केला. शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे.

कुत्र्यांचा महापालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु महापालिका दुर्लक्ष करत आहे. भटकी कुत्री पहाटेच्या वेळी अथवा रात्री गाड्यांच्या मागे धावतात. एकटा माणूस दिसला की, त्याच्यावर धावून जातात. रात्रीच्या वेळी कुत्री जोरजोरात भुंकतात. त्या आवाजाने नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.