भडगांव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा. शेतकरी संघटनांची मागणी.

भडगाव (प्रतिनिधी) — 

मागच्या एक महिन्या पेक्षा जास्त कालावधीपासून भडगाव तालुक्यात पावसाने दडी मारली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेली पिके जळून गेली आहेत. पावसाअभावी तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहेत.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. अशी मागणी शेतकरी संघटना, शेतकरी संघर्ष संघटना,बी.आर. एस अशा विविध संघटनांच्या तालुका अध्यक्षांनी एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केलेले आहे कि,

शेतमालाला रास्त भाव मिळत नाही,मागील वर्षीचा कापूस अजून शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यात दुष्काळाचे अस्मानी संकट अश्याने शेतकरी कसा जगेल ? बँकांचे पिक कर्ज कसे फेडायचे असे अनेक प्रश्न शेतकऱ्या पुढे आहेत.त्या साठीच

१)तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा,

२)शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी.

३)तालुक्यात चारा छावण्या सुरु कराव्यात.

४) पिक विमा मंजूर करावा

अश्या मागण्या विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत केल्या आहेत.

यावेळी निवाशी नायब तहसिलदार रमेश देवकर यांना निवेदन देताना शेतकरी संघटना अध्यक्ष अखिलेश पाटील, शेतकरी संघर्ष संघटना अध्यक्ष विजय साळुंके, बी.आर. एस चे अध्यक्ष सतीश पाटील, सरदारसिंग पाटील, मंगीलाल मांडोळे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो — भडगाव निवाशी नायब तहसिलदार रमेश देवकर यांना निवेदन देतांना विजय साळुंखे, अखिलेश पाटील, सतीष पाटील यांचेसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.