भडगांव तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा : महाविकास आघाडीचे मागणी निवेदन…

*भडगांव (प्रतिनिधी)* : महाराष्ट्रात खुपच कमी जेमतेम पेरणी पुरताच पाऊस झाला आहे. एक महिन्यापासून पाऊसच नाही. परिणामी खरीप हंगामातील सर्व पिके करपली आहेत. आता जरी पाऊस आला तरी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटामुळे हवालदिल झाला आहे. पाणी पातळी खाली गेल्याने पाणीप्रश्न आणि गुरांचा चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. सदरची परिस्थिती लक्षात घेता तालुक्यासह जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सह आर्थिक मदत मिळावी, पाणी पुरवठा प्रश्नसह, रोजगार हमी कामे सुरु करावी, विद्यार्थी फी माफ करावी, सरसकट कर्जमाफी द्यावी, पिक विमा मंजूर करावा ई. विविध समस्या सोडविणे कामी शासन स्तरावर तात्काळ उपयोजना व्हावी. या मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने योजना पाटील, दिपक पाटील, अनिल पाटील, प्रदीप पाटील, विलास पाटील, रतिलाल महाजन, संजीव पाटील, याकूबखान पठाण, कमरअली सैय्यद, रमेश भदाणे, पितांबर सूर्यवंशी, भाऊसाहेब पाटील, जयंतीलाल परदेशी, दगा पटेल, कैलास पाटील आदि पदाधिकारी कार्यकर्त्यानी नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे यांना दिले.