भडगाव । महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने नगरपरीषदेचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार यांना नवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा शिर्डी जि.नगर येथे संपन्न झाला. महाराष्ट्र पत्रकार संघचा 14 व्या वर्धापन दिन निम्मिताने विविध क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर यांना नवरत्न रुपाने पत्रकार संघाच्या वतीने सन्मानीत करण्यात आले. व्यासपिठावर साईबाबा संस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी तथा माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, भुमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाई, संस्थानचे उपध्यक्ष चंद्रकांत कदम, संस्थान विश्वस्त सचिन तांबे, पत्रकार संघाचे राज्यध्यक्ष विलासराव कोळेकर, विजय मकासरे, शैलाजा शेख, संपादक सोमनाथ पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
नगर परीषदेचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते प्रशांत पवार यांनी त्याच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात विविध योजना माध्यमातुन केलेली विकास कामे केली या बाबत दखल घेवुन महाराष्ट्र पत्रकार संघा तर्फे प्रशांत पवार यांना उपस्थित मान्यवर यांच्याहस्ते महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने सन्मानीत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष सोमनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील, तालुकाध्यक्ष संजय पवार, पत्रकार सुनिल कासार, लिलाधर पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील, प्राचार्य हेंमत खैरनार, जितेद्र पवार, दिनेश पवार, नितिन पवार, देवेद्र पवार, संदीप पवार, मनिष पवार निलेश पवार, कीरण पवार, वैभव सुर्वे, प्रमोद पाटील सह राज्य भरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.