भडगावच्या विवाहितेचा छळ : पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा

भडगाव : शहरातील माहेरी व नाशिक येथील सासर असलेल्या विवाहितेने घर बांधण्यासाठी माहेरून सहा लाख रुपये आणावेत म्हणून सासरच्यांनी आग्रह धरला मात्र मागणी पूर्ण न झाल्याने विवाहितेला मारहाण करीत छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह पाच जणांविरोधात
भडगाव शहरातील माहेर असलेल्या ऐश्वर्या मनोज अवचिते (23) यांचा विवाह नाशिक येथील मनोज भगवान अवचिते यांच्याशी रीतीरिवाजानुसार 2016 मध्ये झाला. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर त्यांच्या संसारवेलीवर मुलगी झाली. दरम्यान मनोज अवचिते याने विवाहितेला घर बांधकामासाठी माहेरहून सहा लाख रुपये आणावे, अशी मागणी केली परंतु विवाहितेच्या माहेरची परीस्थिती हालाखीची असल्यामुळे पैश्यांची पूर्तता करू शकले नाही. याबाबत विवाहितेच्या आई, वडील व भाऊ यांनी समजून सांगितले असता त्यांनादेखील शिविगाळ करून मारहाण केली. या प्रकाराला कंटाळून माहेरी निघून आल्या.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी विवाहिता ऐश्‍वर्या अवचिते यांच्या फिर्यादीवरून बुधवार, 27 एप्रिल रोजी पती मनोज भगवान अवचिते, सासरे भगवान किसन अवचिते, सासू कमलबाई भगवान अवचिते, जेठ विशाल भगवान अवचिते, जेठाणी भाग्यश्री विचार अवचिते (सर्व रा.एकलहरा रोड, नाशिक) यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार शमीना पठाण करीत आहे.