भडगावमध्ये महाराष्ट्र दिनी स्वच्छता अभियान

0

भडगाव । 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ’स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत भारतीय जनता युवामोर्चाच्या जळगाव ग्रामीण सर्व पदाधिकारी मंडल अध्यक्ष सरचिटणीस आणि सर्व कार्यकार्ताच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत रूग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात येणार आहे.

अभियानात भाजपायुमोच्या 20 मंडलातील पाचशे पदाधिकारी व कार्यकर्ते समावेश असणार असुन पंतप्रधान यांच्या आवाहानानुसार स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशभरात राबविले जात आहेत. युवामोर्चाच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना सहभागी करुन गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे भाजपायुमोचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी पत्रक दिले आहे.