भडगाव- शहरातील दोन दुचाकी चोरट्यांसह एका अल्पवयीनास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी चोरी केलेल्या सात दुचाकी काढून दिल्या आहेत. शफीकखाँ अन्वरखाँ (वय 25) , आणि भूषण शिंदे (वय 22 , दोघे रा.भडगाव) अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत. तपासात आणखी काही दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता आहे. कारवाईत 2 स्प्लेंडर , 2 पॅशन प्रो, 1 सीटी 100, 1 बजाज फोरएस, 1 प्लॅटीना अशी एकुण 7 वाहने मिळाली आहेत. या प्रकरणी भडगाव पो. स्टे . ला कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे यांच्यासह लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, जगन्नाथ महाजन, ज्ञानेश्वर महाजन, राजेंद्र निकुंभ, स्वप्नील चव्हाण आदींनी केली. तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली नितीन रावते करीत आहेत.