भडगावात अवतरल बाई पण भारी देवा

भडगाव ( प्रतीनीधी ) : – जागृती मित्र मंडळातर्फे प्रथमच

गणेशोत्सव अंतर्गत मंगळागौर स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर स्पर्धेचे उदघाटन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक डॉ. पूनम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष स्थानी किसान शिक्षण संस्थेचे चेअर मन प्रतापराव पाटील होते.या स्पर्धेत पाच संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सात हजार रुपयांचे प्रथम बक्षीस माधवानंद ग्रुप ने पटकवीले तर दुसरं पाच हजार रुपयांचे बक्षीस स्वरांजली ग्रुप ने पटकवीले . शिवकन्या, शिवकृपा व कलाविष्कार या तीन ग्रुप ला कै. प्रमिला शिंपी यांच्या स्मरणार्थ रवी शिंपी सर व सौं. मनीषा पाटील यांच्या तर्फे रुपये 1200 ची बशीसे देण्यात आली. मंगळागौर स्पर्धेनिमित्त समस्त महिला वर्गाने विविध पारंपरिक वेशभूषा, केशभूषा करून स्पर्धेचा मनसोक्त आनंद लुटला. एक हजार पेक्षा जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.जसं काही बाई पण भारीदेवा भडगावात अवतरलं होते.याप्रसंगी अनेक भगिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. व अशा पारंपरिक स्पर्धेच्या आयोजनाबद्दल मंडळास धन्यवाद दिले.विविध गाण्यावर नृत्य करून महिलांनी मनसोक्त आनंद लुटला. जळगाव येथील सौं. स्वाती कुलकर्णी, सौं. अदिती कुलकर्णी, सुरत येथील सौं. युगंधरा शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. स्वरांजली ग्रुप च्या पासष्ट वर्षीय देवरे आजीने मंगळागौर क्वीन म्हणून मान पटकवीला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल परदेशी व सौं. ममता परदेशी यांनी केले तर आभार उज्वला कासार यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी संगीता चौधरी , सपना परदेशी, रत्ना मराठे, संगीता चौधरी , गायत्री परदेशी, छाया पाटील , कवीता शिंपी , अग्रवाल, नेहा भांडारकर, सविता चौधरी, यांनी परिश्रम घेतले