भडगावात नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

0

घातपाताचा संशय : पोलीसात गुन्हा दाखल

भडगाव- कालपासुन बेपत्ता झालेल्या नऊ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृतदेह पाचोरा रस्त्यावरील र.ना.देशमुख महाविद्यालयाच्या मागील केळीच्या शेतात आढळून आला आहे. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहीती अशी की, बब्बु सैय्यद रा.फतेहपुर (उत्तरप्रदेश) ह.मु.टोणगाव हे बांगडी बनविण्याचा व्यवसाय करतात. काल दुपारी तिन वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा इशम बब्बु सय्यद ( वय ९) हा बैपत्ता झाला. त्याच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. मात्र तो मिळून आला नाही. काल रात्री भडगाव पोलिस स्टेशनला इशमच्या अपरहणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी ही त्याचा शोध सुरू केला. मात्र तो मिळून आला नाही. आज दुपारी चार वाजेच्या सुमारास या विद्यार्थ्याचा मृतदेह पाचोरा रस्त्यावरील र.ना.देशमुख महाविद्यालयाला लागुन असलेल्या डॉ.विजयकुमार देशमुख यांच्या केळीच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. याघटनेने एकच खळबळ उडाली. दरम्यान श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी अप्पर पोलिस प्रशांत बच्छाव डीवायएसपी नजीर शेख यांनी भेट दिली.