भडगाव । शहरातील एका दुकानातील घेतलेल्या 4 पाणी बाटल्यांमध्ये कीटक आढळल्याने पाणी पिण्यार्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण असून याबाबत येथील भाजपा तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी जिल्हा अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र या तक्रार नंतरही संबंधित विभागाने अद्याप कार्यवाही केली नसून जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या कंपनीला पाठिशी घालण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. येथील चाळीसगाव चौफुलीजवळ एका दुकानातुन 23 डिसेंबर रोजी सोमनाथ पाटील यांनी गुप्ताजी फूड्स इंडस्ट्री वाघडी तालुका चाळीसगाव या कंपनीचा एक पाणी बॉक्स विकत घेतला होता.
अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
सीलबंद 4 पाण्याच्या बाटल्या घेतल्या. यात बॅच पे 0043-19 जून 17, बॅच पे 0061 -26 ऑक्टोबर 18, बॅच पे 0041- 16 मे 17, बॅच पे 0041-16 मे 17 आशा अनुक्रमे बॅच व तारखेच्या बाटलीत झुरळ सारखे कीटक आढळून आले आहे. त्या बॉटलसह तक्रार अन्न व औषध प्रशासन विभाग जळगाव यांचेकडे तक्रार करण्यात आली आहे. संबंधित विभागाने केवळ अर्ज स्वीकारला असून सीलबंद पाणी बाटली तपासणीसाठी अद्याप ताब्यात घेतली नाही. व कार्यवाही सुद्धा केली नसल्याने सदर विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचे सोमनाथ पाटील यांनी म्हटले आहे .