भडगावात विवाहितेची जाळून घेवून आत्महत्या

0

भडगाव । तालुक्यातील कजगाव येथील एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून, स्वत:ला जाळून घेवून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सासरच्या लोकांविरूध्द रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कजगाव येथील विवाहिता सना रऊफ खाटीक (वय 26) हिने 19 मार्च रोजी सायंकाळी स्वत:ला जाळून घेतले त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी शाकीर उर्फ मोईन खाटीक (रा. धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रऊफ लतिफ खाटीक, आशियाबी खाटीक, फिरोज लतीफ, फारूक लतीफ, शबानाबी फिरोज, नाजनीनबी फारूक यांच्याविरूध्द रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्लॉट घेण्यासाठी सासरच्या लोकांनी पैशाचा तगादा लावला व शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे विवाहिता सना खाटीक हिने जाळून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत भडगाव पोलिसा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.