भडगावात 12 लाखांचा गुटखा पोलिस अधिकार्‍यांनी पकडला

0

भडगाव- बेकायदा विक्रीसाठी जात असलेला 12 लाख रुपयांचा गुटखा भडगाव पोलिसांनी पकडला. भडगावातील चाळीसगाव रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे. गुटख्याचे पारोळा-भडगाव-चाळीसगाव कनेक्शन असल्याची माहिती मिळाली होती. विमल पानमसाला व व्ही. 1 सुगंधित तंबाखुचे प्रत्येकी 30 पोते असा 12 लाखांचा साठा जप्त करण्यात आला. चाळीसगाव रस्त्यावर गस्त घालत असताना चौफुलीवर त्यांना संशयास्पद टेम्पो (क्र. एम.एच. 19 बी. एम. 4489) दिसून आला. पोलिसांनी टेम्पो थांबवून चालकाकडे चौकशी केली चालकाने उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसांना टेम्पोबाबत संशय आल्याने मालाची तपासणी केली असता त्यात त्यांना गुटखा आढळून आला. पुढील कारवाई बाबत अन्न व औषध प्रशासनातील 24 रोजी भडगाव पोलिस स्टेशन येथे आले. तेथे सर्व माहिती घेऊन मालाची तपासणी व चालकाकडे चौकशी केली. त्यात हा गुटखा राज गोविंददास पंजाबी (रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) यांचा असल्याचे सांगण्यात आले.