भडगाव-एरंडोल प्रवासादरम्यान प्रवासी महिलेचे दागिणे बसमधून लंपास

भडगाव : भडगाव ते एरंडोल दरम्यान बसमधून प्रवास करणार्‍या महिलेच्या पर्समधून 33 हजार 300 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवले. याबाबत भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताने लांबवले दागिणे
संगीताबाई राकेश पाटील (29, रा.वनकोठा, ता.एरंडोल) य ाशुक्रवार, 10 जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्या भडगाव-एरंडोल बसमधून प्रवास करत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील 33 हजार 300 रूपये किंमतीची सोन्याचे व चांदीचे दागीने चोरून नेले.

भडगाव पोलिसात गुन्हा
बुधवार, 15 जून रोजी संगीता पाटील यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर ज्ञात चोरट्यांवर भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार विजय जाधव करीत आहे.