भडगाव कॉंग्रेस कमिटी व सेवादलातर्फे पक्षाचा ध्वजारोहण

0

भडगाव- तालुका काँग्रेस कमिटी व सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने कॉंग्रेस पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. पूनम पवार माध्यमिक विद्यालय भडगाव येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदीप पवार, संजीव पाटील, सेवादलाचे अध्यक्ष वडगाव नालबंदीचे माजी सरपंच मोरसिंग राठोड, जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष याकुब पठाण, तालुका अध्यक्ष मोहसीन पठाण, कमर अली, रतिलाल महाजन, भास्कर सुर्यवंशी, बाळासाहेब देशमुख, जोरसिंग जाधव, किसान पवार, वसंत मखराम, देविदास जाधव, विलास बाविस्कर, सुधाम राठोड, कैलास पाटील, कैलास महाजन आदी उपस्थित होते.